fact check : PM-Kisan ट्रॅक्टर योजनेंतर्गत 5 लाख रुपये देतंय सरकार ?, जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली : सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर देत आहे? वायरल वृत्तानुसार, सरकार पीएम किसान योजनेंर्गत 5 लाख रुपये देत आहे. भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर देण्याचा हा दावा फेक असल्याचे म्हणत ही खोटी जाहीरात असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही.

बनावट जाहिरातीमध्ये दावा केला आहे की, पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार 5 लाख रूपये देत आहे. जाहीरातीमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि अर्ज करण्याबात पूर्ण माहिती देण्यात आली आहे. मात्र, पीआयबी फॅक्ट चेकने ही जाहीरात बनावट असल्याचे जाहीर केले आहे.

केंद्र सरकार यूरिया वापरावर आणणार बंदी
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक बातमी वायरल झाली होती, ज्यामध्ये म्हटले होते की, भारत सरकार शेतात यूरियाच्या वापरावर बंदी घालणार आहे. या दाव्यासोबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कटींगसुद्धा जोडलेले होते. परंतु, जेव्हा पडताळणी करण्यात आले तेव्हा या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

पीआयबी फॅक्ट चेकने शेतात यूरिया बॅन करण्याचा दावा सुद्धा खोटा असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारने शेतात यूरियाचा उपयोग बंद करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.