कबुतरांनी नेत्याला देखील सोडलं नाही, मुलाखत चालु असतानाच डोक्यावर केली ‘घाण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या देशात कबुतरांना आपण शांतीचा दूत म्हंणून मानतो. जुन्या काळात अनेकदा कबुतरांचा उपयोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश देण्यासाठी सुद्धा केला जात होता मात्र शिकागोमध्ये कबुतरे एक मोठा त्रास होऊन बसले आहेत. शिकागोमध्ये एका राजकीय व्यक्तीच्या मुलाखती दरम्यान कबुतरांनी चक्क त्या व्यक्तीच्या डोक्यावरच विष्ठा केली.

डेमोक्रेटिक स्टेट रिप्रेजेंटेटिव जैम एंड्रेड शिकागो ट्रांजिट अथॉरिटी स्टॉप वर एका रिपोर्टर सोबत कबुतरांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत होते. त्याचदरम्यान एका कबुतराने त्यांच्या डोक्यावर विष्ठा केली. त्यामुळे सुरु असलेल्या मुलाखतीत व्यत्यय आला.

बहुतेक या कबुतरांनी मला ओळखले असे यावेळी जैम एंड्रेड म्हणाले. तसेच कबुतरांच्या अशा कृत्यांमुळे सर्व नागरिक परेशान असल्याचे जैम यांनी सांगिलते. त्यामुळे आता मला ही दुर्गंधी साफ करावीच लागणार आहे असे जैम यावेळी म्हणाले.

Advt.

जैम यांनी कबुतरांच्या या परेशनीला स्वतःचा प्रॉब्लेम समजून सोडवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी त्या लोकांचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यांनी कबुतरांना खायला घातले होते.

याबाबत एका स्थानिकांनी म्हंटले आहे की, जेव्हा इतर लोकांना कबुतरांचा त्रास होत होता त्यावेळी जैम यांनी लक्ष धीले नाही मात्र स्वतःला त्रास झाला तर या गोष्टीला गंभीर समस्या म्हणून सांगत आहे.