काय सांगता ! होय, चक्क विमानात घुसलं कबुतर, बघून प्रवासी ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखाद्या विमानाला एखादा पक्षी धडकल्याचे तुम्ही ऐकले असेल परंतु एखादा पक्षी विमानात घुसल्याचे तुम्ही ऐकले आहे का? गुजरातच्या अहमदाबादपासून राजस्थानच्या राजधानीत जयपूर येथे असलेल्या गो एअरच्या एक विमानामध्ये असेच काही पाहायला मिळाले. येथे विमान उड्डाणापूर्वी विमानात कबूतर उडत असल्याचे दिसले.

हे कबूतर विमानाच्या उड्डाणापूर्वी प्रवाशांच्या लगेज शेल्फमधून बाहेर पडले, ज्यामुळे क्रु मेंबर आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. परंतु त्यानंतर काही वेळातच कबूतर विमानातून बाहेर पडले. काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला होता जो व्हायरल होत आहे.

सांगण्यात येत आहे की उड्डाणापूर्वी एका प्रवाशाने आपली हॅंड बॅग ठेवण्यासाठी विमानाचे लगेज शेल्फ ओपन केले, ते ओपन करताच त्यातून एक कबूतर बाहेर पडले. हे कबूतर विमानात इकडे तिकडे उडू लागले. विमानात कबूतर पाहिल्यानंतर प्रवासी देखील हैराण झाले. विमानात बसलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, विमानात कबूतर उडताना पाहून सर्व जण हैराण झाले होते. केबिन क्रू मेंबर लोकांना शांत करत होते. त्यांनी ग्राऊंड स्टाफला सूचित केले आणि बऱ्याच प्रयत्नानंतर कबूतर बाहेर काढले.

हे विमान संध्याकाळी 6.15 वाजता जयपूरला लॅंड होणार होते, परंतु कबूतर विमानात शिरल्याची घटना घडल्याने 6.45 वाजता हे विमान विमानतळावर पोहोचले.