सोशल मिडीया ‘आधारकार्ड’शी लिंक करा, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे अशाप्रकारच्या फेक न्यूजवर  बंदी आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात एका याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सोशल मीडिया अकाउंट आधार कार्डशी जोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये ट्विटर, फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया अकाउंट्सला आधार कार्डशी जोडण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात  केलेल्या याचिकेत  फेक न्यूजला आळा बसण्यासाठी  सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, निवडणूक अयोग आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाला आदेश देण्याची मागणी केली आहे.

भारतात सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूज आणि अफवा पसरवून मोठ्या प्रमाणात समाज दूषित करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे यावर केंद्र सरकारने बंदी घालायला हवी अन्यथा कडक कायदा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट या याचिकेवर काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.