‘पॅकेज’ संदर्भात अजित पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  लॉकडाऊन मुळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व कामकाज ठप्प आहे. राज्यावर आर्थिक संकट उभे राहिले असून यावर आपल्याला मार्ग काढायचा आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. यासाठी मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकार लॉकडाऊनबाबतची जबाबदारी राज्यांवर देण्याची शक्यता आहे. शहरी भागातून स्थलांतर झाल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र खबरदारी घेतली तर घाबरण्याचे कारण नाही,” असंही पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज औंध ते काळेवाडी साई चौक इथे उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. या पुलाच्या उद्घाटनानंतर पवार माध्यमांशी बोलत होते.

राज्यांतील जनतेसाठी सरकारने पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार पॅकेज जाहीर करणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. मध्यंतरी 21 लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले पण प्रत्येक राज्यातील जनतेच्या हातात प्रत्यक्षात किती मदत येणार याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही म्हणतात हे नुसते मोठे आकडे पाहायला मिळाले. गरीब जनतेला ही मदत मिळायला हवी, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहे.”

देशातील चौथा लॉकडाऊन संपण्यासाठी दोन दिवस उरले आहेत. शिवाय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्याबाबत अजित पवार म्हणाले की, लॉकडाऊनबद्दल भारत सरकार काय निर्णय घेतंय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतीलच, पण माझ्या अंदाजाने वेगवेगळ्या राज्यांवर ते जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

“केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन त्यांच्या पातळीवर कोरोना रोखण्याचे प्रयत्न करत आहे.