खराळवाडी आणि देहूगावात एटीएम फोडले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरात एटीएम मशीन फोडून रोकड लांबवणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी शहरात पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खराळवाडी येथे कॅनरा बँकेचे तर देहूरोडच्या हद्दीत देहूगाव येथे एसबीआय बँकेचे एटीएम फोडले आहे. मात्र रक्कम चोरीला गेलेली नाही.
पिंपरी येथे खराळवाडी परिसरात कॅनरा बँकेचे एटीएम केंद्र आहे.

चोरट्यांनी बुधवारी रात्री एटीएम केंद्रात प्रवेश करून मशीन दगडाने फोडून उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील रक्कम काढण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर चोरट्यांनी एटीएम केंद्राचे शटर लावून पोबारा केला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

देहूगाव येथे एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात चोरटे घुसले. पैसे बाहेर येणारा भाग (कॅश डिस्पेन्सर) फोडून बाहेर ओडून काढला. मात्र त्यातून त्यांना पैसे काढता आले नाहीत. यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला व चोरटयांनी पळ काढला. नागरिकांनी याबाबत देहूरोड पोलिसांना कळवले. रक्कम चोरीला न गेल्याने बँकेच्या वतीने फिर्याद दिलेली नव्हती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com