सांगवीत हॉटेल व्यवस्थापकासह दोघांना मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – जेवण व दारु लवकर न दिल्याने चिडून हॉटेल व्यवस्थापकासह दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री पिंपळे गुरव येथे घडली.

राजू कालाचंद बॉस (22, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तर इम्रान शफियोद्दीन जुनेदी (29, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी) याला अटक केली असून म्हस्के (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) मानसिंग आदियाल (रा. पिंपळे गुरव) तसेच अन्य दोन अनोाळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पिंपळे सौदागर येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गुन्हा दाखल असणारे सर्वजण गेले होते. हॉटेलमधील कर्मचा-यांनी जेवण व दारू लवकर न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी हॉटेलमध्ये वाद घातला. यात हॉटेल व्यवस्थापक सुधाकर शेट्टी यांना दगड मारून जखमी केले. त्यावेळी राजू व त्यांचा मित्र पंकज रॉय भांडणे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही दगड फेकून मारले. तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/