पिंपरी-चिंचवडच्या मनपा आयुक्तांच्या बंगल्यातील सुरक्षारक्षक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, श्रावण हार्डीकर होम ‘क्वारंटाईन’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील निवासस्थानी कार्यरत असलेला सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आयुक्त हर्डीकर हे ‘होम क्वारंटाईन’ झाले असून त्यांचे नमुने तपसाणीसाठी पाठविले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्ण संख्या तीन हजाराच्या पुढे गेली आहे. आजपर्यंत 25 ते 30 महापालिका कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये वैद्यकीय, आरोग्य, सुरक्षा रक्षक, अभियंता, कर संकलन विभागातील कर्मचा-यांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा मोरवाडीत सरकारी ‘अविष्कार’ बंगला आहे. त्यांच्या बंगल्यासमोर कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकाच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाली होती. सुरक्षारक्षकासह कुटुंबियांचे रिपोर्ट रविवारी पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आयुक्त हर्डीकर सोमवारपासून होम क्वारंटाईन आहेत.

”मी होम क्वारंटाईन आहे. घरातून काम करत आहे. आज घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत”, : आयुक्त श्रावण हर्डीकर