Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : कंपनीच्या ई-मेलचा गैरवापर करुन पाच लाखांची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | कंपनीच्या ई-मेल आयडीचा गैरवापर करुन मालाची खरेदी करुन पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 10 जानेवारी 2024 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत एसीई इंजिनियरींग प्रा.लि. खालुंब्रे येथे घडला आहे. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pimpri Cheating Fraud Case)

याप्रकरणी कंपनीचे संचालक अनंत सतविदरसिंग कालरा (वय -40) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. यावरून निलेश तुकाराम नेवसे (वय 42 रा. कासारी, ता. शिरुर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कंपनीत कामाला असताना कंपनीचा लॅपटॉप वापरुन कंपनीच्या ई-मेल वरुन अनेक वेन्डर यांना मेल करुन त्यांच्याकडून कडून माल खरेदी केला. हा माल परस्पर विकला. आरोपीने मागील चार महिन्यात वारंवार अशाप्रकारे माल खरेदी करुन विक्री करुन 5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीने बनावट बिलाचा वापर करुन माल खरेदी केल्याचे दिसून आले. दरम्यान, निलेश नेवसे हा कंपनीचा लॅपटॉप घेवून फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरणार करत आहेत.

बनावट दस्त करुन फसवणूक

भोसरी : दस्त नोंदणी करताना बनावट दस्त व घोषणापत्र सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 30 डिसेंबर 2015 रोजी लांडेवाडी येथील दुय्य्म निबंधक कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी प्रभारी सह दुय्यम निबंधक लांडेवाडी, भोसरी हवेली 14 आशा दिलीप लाडके (वय-53 रा. दिघी, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन रतनलाल गुलाबचंद गुंदेशा (रा. आनंद पार्क सोसायटी, शंकरशेट रोड, पुणे) याच्यावर आयपीसी 420, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी रतनलाल गुंदेशा याने हवेली तालुक्यातील पिसोळी येथील जमिनीचा दस्त
नोंदविताना मारुती लक्ष्मण होले यांचे कुलमुखत्यार असल्याचे भासवले.
आरोपीने खोटे घोषणापत्र सादर करून बनावट दस्त तयार करून त्यावेळच्या दुय्यम निबंधकाची
फसवणूक केली आहे. हा प्रकार निदर्शनास येताच निबंधक कार्यालयातर्फे भोसरी पोलीस ठाण्यात
तक्रार देण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार