महायुती सरकारला धडा शिकवण्यासाठी अण्णा बनसोडेंना विजयी करा : गिरीजा कुदळे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महायुती सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मोठा मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी येथे केले.

पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ काल पिंपरीतील प्रभाग क्र. 21 पिंपरीगाव व कॅम्प परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कुदळे बोलत होत्या. या पदयात्रेत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रभागातील नगरसेवक माजी उपमहापौर डब्बू आसवाणी, नगरसेविका उषा वाघेरे, निकीता कदम, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, जगन्नाथ साबळे, माजी नगरसेविका शांती सेन, रेश्मा कांबळे, पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवा नेते ऋषीकेश वाघेरे, संतोष वाघेरे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात महिला व युवा वर्गाचा सहभाग उल्लेखनीय होता. पदयात्रेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी बनसोडे यांना औक्षण करून शुभेच्छा दिल्या. अण्णा दादू बनसोडे यांना घड्याळ समोरील बटन दाबून प्रचंड बहूमतानी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी गिरीजा कुदळे म्हणाल्या की, राज्यातील शिवसेना, भाजप महायुती सरकारचा कारभार पाहिला असता. सरकारला सर्व पातळ्यांवर अपयश आले आहे. पिंपरी चिंचवडची स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन भाजप, शिवसेना महायुतीने दिले होते. मात्र, आज शहराची अवस्था अतिशय बकाल झाली आहे. पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय केल्याचे भाजप सांगत आहे. मात्र, शहरात आयुक्तालय झाल्याचा कोणताही सकारात्मक परिणाम दिसत नाही. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या आमदाराने कोणतेही प्रभावी काम मतदारसंघात केलेले नाही. पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना कामाचा मोठा अनुभव आहे.

यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती उषा वाघेरे म्हणाल्या की, पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा मागील निवडणुकीत विजय अतिशय थोडक्यात हुकला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी अविरत परिश्रम घ्यावेत असे आवाहन वाघेरे यांनी केले.

माजी उपमहापौर डब्बू आसवानी म्हणाले की, पिंपरी मतदारसंघाला काम करणारा माणूस हवा आहे. मतदारसंघातील अन्य उमेदवारांच्या मानाने अण्णा बनसोडे यांची काम करण्याची क्षमता कितीतरी पटीने अधिक आहे. मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही बनसोडे यांनी जनमानसात जाऊन काम केले. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आसवानी यांनी केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी