Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 190 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाची दुसरी लाट (second wave) ओसरत आहे. शहरात आज नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड (Pimpri Corona) शहरामध्ये 190 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 190 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 64 हजार 726 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 163 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 59 हजार 425 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 956 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 956 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरात पूर्वी मृत्यू झालेल्या 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4344 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 17,733 हजार जणांना लस

रविवारी (दि.01) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 17 हजार 733 जणांना लस देण्यात आली असून पिंपरी चिंचवड शहरात लसीकरणाचा दहा लाखांचा टप्पा पार झाला आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 11 लाख 13 हजार 273 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Tital : Pimpri Corona | 190 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours; Learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या काय आहे ई-रुपी, कसे करते काम आणि काय होईल फायदा

Pune News | वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन; पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत झाला निर्णय

Uddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा (व्हिडिओ)

Maharashtra Police | राज्यातील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांचं ‘प्रमोशन’ लवकरच ! PI, उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या 5 ऑगस्टपर्यंत