Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 1125 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) दैनंदिन रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याचबरोबर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona Update) नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 125 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 545 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 989 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 545 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 55 हजार 519 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 11125 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 45 हजार 156 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 6497 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 217 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6 हजार 497 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर यापूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील 04 रुग्णांचा मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,597 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | In the last 24 hours, 1125 patients in Pimpri Chinchwad have been corona free, find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | निलेश घायवळ टोळीतील एकाला मोक्का प्रकरणात अटक

Rupali Chakankar | वाईन विक्रीचं धोरण आर्थिकदृष्ट्या योग्य, रुपाली चाकणकर यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे समर्थन

Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील 12 जणांना जामीन मंजूर

Digital News Publishers-Accreditation | डिजिटल वृत्त संस्थामध्ये काम करणार्‍या पत्रकारांना मिळणार
अधिस्वीकृती

Munmun Dutta | तारक मेहतामधील ‘बबीता’ची 4 तासांच्या चौकशीनंतर जामीनावर सुटका? अखेर चर्चांवर बबिताने सोडलं मौन

LIC IPO | जाणून घ्या एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची सर्वात सोपी पद्धत

Pune Crime | पुण्यात अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून, मृतदेह बाथरुममध्ये आढळल्याने प्रचंड खळबळ

Mumbai Crime News | 100 रुपये परत न केल्याने मित्रानेच आवळला तरुणाचा गळा; मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून दिले पेटवून

PM Narendra Modi | राष्ट्रवादी काँग्रेसची मोदींवर टीका; म्हणाले, ‘ज्या राज्यात निवडणूक त्याची उचलायची तळी आणि महाराष्ट्राच्या बदनामीचे धोरण एककल्ली