धक्कादायक ! लग्नाची विचारणा केली म्हणून त्याने प्रेयसीसोबत केले ‘असे’ काही

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासारवाडी येथे लग्नाची विचारणा केली म्हणून प्रियकराने प्रियशीला चटके दिले. तसेच तिच्या घरी जाऊन विनयभंग केला व प्रियकराच्या वडिलांनी समाजात बदनामी करत धमकी दिली.
या प्रकरणी २३ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. तर अमित लाड व मोहन लाड (रा. रामराज्य बिल्डिंग, कासारवाडी, पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१४ पासून ते १३ एप्रिल २०१९ पर्यंत सुरू होता.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व अमित लाड यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. यामुळे मुलीने अमितला लग्नाची गळ घातली २०१८ मध्ये ती त्याला नाशिक फाटा येथील एसटी स्टँड वर लग्नाबाबत विचारणा करण्यासाठी गेली असता त्याने तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्याच्या टू व्हीलर गाडीची चावी लाईटवर गरम करून चटके दिले. तो निघून जात असताना तिने गाडी पकडून ठेवलेली असल्याचे माहित असताना देखील त्याने तिला फरफटत नेले.

तसेच १३ एप्रिल रोजी अमित तिला भेटण्यासाठी घरी गेला. तेथे त्याने तिचा विनयभंग केला. वडील मोहन लाड यांनी तिला शिवीगाळ करत नातेवाईकांमध्ये बदनामी केली. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.