वारंवार पैसे मागत असल्यानं पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, सर्वत्र खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नी वारंवार पैसे मागत असल्याने होत असलेल्या भांडणाच्या त्रासाला कंटाळून पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः आमहत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री भोसरी येथील शास्त्री चौकात घडला. प्रियांका नीलेश देशमुख (30, रा. रा . शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती नीलेश देशमुख (35, रा. रा . शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी) याने आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांका ही मुळची अमरावती येथील असून नीलेश हा इंदौरचा आहे. दोघांनी प्रेम विवाह केला असून त्यांना सात वर्षाची मुलगी आहे. नीलेश हा चाकण येथे एका कंपनीत काम करत होता तर प्रियांका की एक महिन्यापासून भोसरी येथील एका कंपनीत डाटा एंट्री चे काम करत होती. सोमवारी त्यांनी त्यांची मुलगी मित्राकडे सोडली होती. रात्री नऊ वाजले तरी दोघे फोन उचलत नसल्याने मुलगी मित्राकडे झोपली. आज सकाळी मित्र घरी आला आणि दरवाजा ठोठावला तरी आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना सांगण्यात आले.

भोसरी पोलिस घटनास्थळी आले. स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी प्रियांका हीचा खून झालेला तर नीलेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी मिळालेल्या चिट्ठीत पत्नी वारंवार पैसे मागत होती, त्यातून वाद होत होते असे लिहले आहे. त्यामुळे पत्नी वारंवार पैसे मागत असल्याने होणाऱ्या वादाला कंटाळून नीलेश ने हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तपास भोसरी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –