Pimpri Mahalunge MIDC Crime | पिंपरी : पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला अटक, पिस्टल व 5 काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Mahalunge MIDC Crime | बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत (Pistol Seized). ही कारवाई शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील (Khed Taluka) मौजे महाळुंगे गावच्या हद्दीतील महाळुंगे ते आंबेठाण रोडवरील द्वारका सिटी समोर केली.

सोनु नकीक अहमद (वय-31 सध्या रा. महाळुंगे ग्रामपंचायत शेजारी मुळ रा. बहादुरपुर कच्छा, फुलपुर, प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल माटे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) बेकायदेशीर शस्त्र बागळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत. त्यानुसार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमोल माटे यांना महाळुंगे ते आंबेठाण रोडलगत असलेल्या द्वारका सिटी समोरील चिकन सेंटर सोमर एक व्यक्ती उभा असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाऊन आरोपी सोनु अहमद याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 32 हजार 500 रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे,
पोलीस अंमलदार राजू राठोड, राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर,
प्रकाश चाफळे, राजु जाधव, संतोष काळे, सांगळे, शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, गणेश गायकवाड,
अमोल माटे, संतोष वायकर, मंगेश कदम यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Office New Building | पुणे पोलीस आयुक्तालयाचे रुप पालटणार, राज्य सरकारकडून 193 कोटींचा निधी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक, तीन गुन्ह्यातील चार लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Nashik City Police | प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची CAA कायद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका, ”बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…”

Pune-Baramati-Shirur-Maval Lok Sabha | बारमती मतदारसंघात 7 मे तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 13 मे रोजी होणार मतदान

IAS Rajendra Bhosale | सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार – नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले