पिंपरीत बेकायदेशीर पिस्टल सह एकजण अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीरपणे पिस्टल वापरण्याऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडुन एक पिस्टल जप्त केले आहे. ही कारवाई आज शनिवारी करण्यात आली.
खंडणी/दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा पथक पिंपरी-चिंचवड शहरात संचारबंदीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते.

दरम्यान नवनाथ रसवंती गृह समोर कृष्णा नगर चिखली पुणे येथे एक इसम संशयितरित्या थांबलेला असून त्याच्याकडे पिस्टल सारखे हत्यार आहे अशी खात्रीशीर माहिती पोलीस नाईक किरण काटकर यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या पथकाने सापळा रचून अमोल बसवराज वाले (22, रा. सेक्टर नंबर 22, वाले रेशनिंग दुकान जवळ इंदिरा नगर निगडी पुणे) यास ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याचेकडून चाळीस हजार रुपये किंमतीचे एक लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा ऐवज मिळून आला. त्याचे विरुद्ध चिखली पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.