पिंपरी : मित्रांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे मित्रांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. सचिन भीमराव भिंगारे (२७ रा. पवार वस्ती, दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन आपल्या दोन मित्रांसोबत सोमवारी रात्री दारू पित बसला होता.

त्यावेळी मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी दोन मित्रांनी त्यास हाताने दोन तीन ठोसे मारले. यामुळे सचिन चक्कर येऊन जागेवरच पडला. यामुळे घाबरलेल्या मित्रांनी घटनास्थळावरून पलायन केले. सचिन याच्या वडिलांनी त्यास वायसीएम रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत सचिन यांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. तसेच अंतर्गत जखमही झालेली नव्हती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तपास भोसरी पोलीस करत आहेत.

You might also like