पिंपरी : 17 वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल दरोडेखोरास अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – 17 वर्षांपूर्वी याच तारखेला देहूरोड येथील एका सराफ दुकानावर दरोडा टाकून 21 तोळे सोने आणि साडे आठ लाख रुपयांची रोकड चोरुन फरार असलेल्या अट्टल दरोडेखोरास अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने केली आहे.
रघुविरसिंग चंदुसिंग टाक या दरोडेखोरास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
दिनांक २९/७/२००३ रोजी पहाटे ३/१५ वाजता ५ आरोपींनी धनराज केसरी मल सोनिगरा (रा. देहूरोड) यांच्या सोनिगारा ज्वेलर्स वर दरोडा टाकला. सोनिगरा यांच्या मुलीच्या गळ्याला चाकू लाऊन धाक दाखवला. 21 तोळे सोन्याचे दागिने व 8,50,000 रोख रक्कम चोरून नेली. तेंव्हापासून दरोडेखोर टाक हा फरार होता. वेश बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.

या दरोडेखोराची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, राजीव ईघारे, दयानंद खेडकर, भरत माने यांच्या पथकाने जालना येथून त्यास शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील कारवाई करिता देहूरोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

टाक याच्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात 20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये परतुर जालना येथे 399,402, 425, 457,393, जालना येथे 380, 395, तालुका जालना येथे बँम्बे पो.अँक्ट 135, उस्मानपुरा जालना येथे बँम्बे पो.अँक्ट 122, जालना येथेआर्म अँक्ट 3(25), मुकुंदवाडी औरंगाबाद येथे 392,457,380, आकोला येथे 395, कारंजा वाशीम येथे 395,397, भिवापूर नागपूर येथे 392,457, वडवणी बिड येथे 457,380, माजलगाव बिड येथे 395,397, 394,395, वाशीम येथे 395, उदगीर नांदेड येथे 395,457, बिड येथे 395,397, मुंब्रा येथे 395 आणि चतुरशृंगी पुणे येथे 395
प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.