पतीला सोडून माझ्यासोबत रहा, आपण लग्न करू म्हणणारा ‘भाई’ आला ‘गोत्यात’

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पतीला सोडून माझ्यासोबत रहा, आपण लग्न करू असे म्हणून विवाहितेला मारहाण करणाऱ्याच्या सांगवी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच मी इथला भाई आहे असे म्हणत त्याने विवाहित महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवत धमकावत घरासमोर गोंधळ घातला.

याप्रकरणी 27 वर्षीय विवाहित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी इसाक उर्फ गुड्या रज्जाक शेख (रा. गल्ली नं. 3, जवळकर नगर, पिंपळे गुरव) याला अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.19) दुपारी एकच्या सुमारास जवळकर नगरमधील चांगभलं हाईट्स पिंपळे गुरव याठिकाणी घडला. आरोपी वारंवार पाठलाग करुन त्रास देत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला तु तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्यासोबत रहा, आपण लग्न करू असे म्हणाला. तक्रारदार महिलेने त्याला नकार दिला. त्यानंतर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास आरोपी महिला रहात असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये आला. त्याठिकाणी तक्रारदार महिलेचा पती उभा असताना आरोपी त्यांच्या अंगावर धावून जात मी इथला भाई आहे असे म्हणत त्यांना शिविगाळ केली.

तसेच तक्रारदार महिलेलाही मारहाण केली. या मारहाणीत तक्रारदार महिला जखमी झाल्या आहेत. त्यानंतर आरोपीने तक्रारदार पतिला फोन करून शिवीगाळ करून धमकी दिली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/