पिंपरी : छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘स्पेशल टीम’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – संपूर्ण देशातुन सर्व सामान्यांचा उद्रेक होणारी घटना हैदराबादला घडली. या ठिकाणी घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘स्पेशल टीम’ तयात करण्यात आलेल्या आहेत. या टीमला खुद्द पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांनी मार्गदर्शन केले असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. महाविद्यालय परिसर किंवा बाहेर मुलींची छेडछाड होते त्या ठिकाणी ही ‘टिम वॉच’ ठेवून राहणार आहे.

याच बरोबर शहरातील सर्व रिक्षा, ओला, उबेर, बस चालक यांच्या संघटनेचे पदाधिकारी, मालक यांच्या मीटिंग घेण्यात येणार आहेत.

हैदराबाद येथील घटनेनंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी अनेक उपाय योजना राबविल्या आहेत. पैकी आज पासून शहरातील मुलींच्या छेडछाडीचा मुद्दा लक्षात घेता प्रत्येक महाविद्यालयात व शाळा परिसरात ‘विशेष टीम’ नेमण्यात येणार असून ही टिम गस्त घालणार आहे. आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातील महिला व पुरूष अधिकारी, कर्मचाऱ्यांची हि ‘टीम’ असणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील ‘टिम’ला आयुक्तलयात बोलावून प्रथम गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानंतर स्वतः पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सूचना दिल्या. तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. शहरात यापूर्वी महिला अत्याचाराच्या घटनांत ‘रेकॉर्ड’वर असलेल्याना पुन्हा समज, नोटीस देण्यात येणार आहे.

यापूर्वीही छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस उपाय योजना करत होते. मात्र हैदराबाद घटनेनंतर आता पुन्हा एकदा ही कारवाई सुरु करण्यात आली असून यामध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे.

Visit : Policenama.com