पिंपरीतील खराळवाडीत तीन वाहनांची तोडफोड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – गाडी पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एक टोळक्‍याने तीन वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत पसरवली. ही घटना पिंपरीतील खराळवाडी परिसरात शुक्रवारी रात्री घडली. पिंपरी येथे गाडी पार्क करण्याच्या कारणावरून भांडणे झाली.

त्यातच एका वाहनाचा दुसऱ्या वाहनाला धक्‍का लागला. या कारणावरून एका टोळक्‍याने धुडगूस घालत खराळवाडी परिसरातील दोन छोटा हत्ती टेम्पो आणि एका मोटारीची काच फोडत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच टोळक्‍याने धारदार शस्त्राचा वापर करी केलेल्या मारहाणीत काहीजण जखमीही झालेले आहेत.

पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे कामही सुरू आहे. शहरामध्ये पूर्वी वाहनांच्या तोडफोडीचे सत्रच सुरू होते. सांगवी, वाकड, पिंपरी, भोसरी, चिखली, निगडी या पोलीस ठाण्यात वारंवार तोडफोडीच्या घटना घडल्या. आयुक्तालय झाल्यापासून या घटना थांबल्या होत्या. मात्र काही दिवसांपासून पुन्हा एकदा तोडफोडीच्या घटना सुरु झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like