Pimpri Wakad Crime | पिंपरी : ऐकमेकांकडे पाहण्यावरुन काळेवाडीत दोन टोळक्यात राडा, तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Wakad Crime | एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या कारणावरून दोन टोळ्यामध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक केली आहे. हा प्रकार काळेवाडी भागातील भारतमाता चौकातील ऑक्सिकेअर हॉस्पिटल समोर शुक्रवारी (दि.29) रात्री घडला.

अक्षय अनिल सरवदे (वय-28 रा. कोकणे नगर, काळेवाडी) याने दिलेल्या तक्रारीवरुन शंतनु विजय शिंदे (वय-22 रा.कैलासनगर, थेरगाव) याला अटक केली आहे. तर सतिष उर्फ बंड्या सगर (वय-30 रा. काळेवाडी) याच्यावर आयपीसी 307, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि त्याचा मित्र मोहित सनेर हे काळेवाडी गावठाण कडे जात होते. त्यावेळी अक्षय याच्या ओळखीच्या आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यावेळी मोहित याने मध्यस्थी करुन भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्याला देखील मारहाण केली. शंतनु याने हातात लोखंडी रॉड घेऊन थांब तुला खल्लासच करतो असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याच्या परस्पर विरोधात शंतनु शिंदे याने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अक्षय अनिल सरवदे व मोहित संजय सनेर यांच्यावर
आयपीसी 308, 323, 504, 506, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू आणि त्याचा मित्र भारतमाता चौकात
थांबले असताना आरोपींनी त्यांना रागाने पाहण्याच्या कारणावरुन मारहाण केली.
मी पोलिसांचा खबरी आहे. तुम्हाला बघुन घेईन, अशी धमकी अक्षय सरवदे याने शंतनुला दिली.
आरोपींनी दगडाने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना मारण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश नलावडे (Nilesh Nalawade API) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?