International Woman’s Day 2020 पिंपरीत महिला दिनाची सुरुवात ‘अर्धमॅरेथॉन’ने

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – महिला दिननिमित्त आयोजित अर्धमॅरेथॉन मध्ये आज रविवारी सकाळी हजारो महिलांनी सहभाग घेतला. आयुर्वेद रूग्णालय, स्टर्लिंग हॉस्पिटल व निगडी पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

3 किमी, 5 किमी व 10 किमी अशी अर्धमारेथॉन स्पर्धा आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आयुर्वेद रूग्णालय व स्टर्लिंग हॉस्पिटलचे डायरेक्टर राकेश नेवे आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी प्लॅग दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. निगडी येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. महिलांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण होते.