गावठी पिस्तूलासह एकजण एलसीबीच्या (LCB) जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गावठी पिस्तूलासह फिरणाऱ्या एकाला पुणे ग्रामीणच्या एलसीबीने अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व १ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

योगेश केशव गायकवाड (२०, कांब्रे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगूरु यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, योगेश गायकवाड याच्याजवळ गावठी पिस्तूल असून तो कामशेत येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे १ दशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतुस मिळून आले. ते जप्त करून त्याला कामशेत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरु, सहायक पोलीस फौजदार विजय पाटील, कर्मचारी प्रकाश वाघमारे, गणेश महाडिक, ज्ञानदेव क्षीरसागर, चंद्रशेखर मगर, रौफ इनामदार, बाळासाहेब खडके यांच्या पथकाने केली.

Loading...
You might also like