Video : ‘मेक इन इंडिया’चे आणखी एक ‘यश’, आता ऑस्ट्रेलियामध्ये धावणार भारतात बनलेली ‘मेट्रो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर सुरु केलेल्या मेक इन इंडिया या योजनेने मोठे यश मिळवल्याचा दावा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, भारतात तयार झालेली रेल्वे आता ऑस्ट्रेलियात धावणार आहे. मेक इंडिया या योजनेमुळे भारत प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुढे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, तंत्रज्ञानाच्या जगात भारत एक उगवता देश आहे. त्यामुळे भारतात तयार झालेली हि रेल्वे याचे उत्तम उदाहरण आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या या रेल्वे ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये धावणार आहेत. हि रेल्वे ड्रायव्हरलेस असणार आहे. म्हणजेच विना ड्रायव्हरची हि रेल्वे धावणार आहे. भारतीय कंपनी एल्सटॉम एसए हिने या रेल्वे तयार केल्या असून आंध्रप्रदेशातील श्रीसिटीमध्ये असेम्बल करण्यात आल्या आहेत. ६ डब्ब्यांवाल्या अशा २२ रेल्वे सिडनीत धावणार आहेत.

दरम्यान, हि रेल्वे पूर्णपणे स्वयंचलित असून यात एलईडी दिवे, सीसीटीवी कॅमेरे त्याचप्रमाणे आपत्कालीन सुविधा यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. भारतीय कंपनी एल्सटॉम एसए यांनी १५ वर्षांसाठी सिडनी मेट्रोबरोबर यासाठी करार केला आहे. त्यामुळे भारतात तयार झालेली हि रेल्वे पाहून मेक इन इंडियाची सफलता तुमच्या लक्षात येते.

 

आरोग्यविषयक वृत्त –

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका 

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

 रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’