केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा ! ‘रेल्वे’… बँकांनंतर आता ‘या’ क्षेत्रात होणार खासगीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने देशातील 151 रेल्वेंचे खासगीकरण करणार असल्याचे वृत्त याआधीच आले आहे. आता यानंतर सरकार रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करत त्यांना खासगी क्षेत्रात सोपवण्याची योजना तयार करत आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे, हे काम लिलावाच्या माध्यमातून होणार आहे. रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणासाठी लिलाव करण्यात येईल आणि यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रेल्वे मंत्री पियूश गोयल यांनी पुढे सांगितले की, भारत सरकारने रेल्वे गाड्यांचे खासगीकरण केल्यानंतर आता सरकार भारतीय रेल्वे स्टेशन आधुनिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर लिलावाच्या माध्यमातून खासगी क्षेत्राला सोपवण्यात येणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

गोयल यांनी सांगितले की, गुड्स कॅरिडोर प्रकल्पावर कामाची गती वाढवण्याची गरज आहे. कोविड-19 मुळे या कामाला उशीर झाला आहे. गुड्स कॉरिडोरसाठी पश्चिम बंगालमध्ये जितक्या जमिनीची आवश्यकता आहे, राज्य सरकारने अद्याप या प्रकल्पासाठी स्थापन केलेली विशेष संस्था हस्तांरित केलेली नाही. जर राज्य सरकारने याला मंजूरी दिली तर कलकत्त्यामध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यात येईल. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यात विमान सेवा आणि उपनगरीय रेल्वे सेवा आता सुरु करण्याच्या विरोधात असल्याचे गोयल यांनी सांगितले.