PM इम्रान खान यांनी कसा रोखला कोरोनाचा प्रादुर्भाव ? WHO नं सांगितली पाकिस्तानची रणनीती

पोलीसनामा ऑनलाइन – पाकिस्तानात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ३ लाख १२ हजार ८०६ वर पोहचली आहे. तर ६ हजार ४८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना संसर्गाची संख्या रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीबाबत पाकिस्तानचे पुन्हा कौतुक केलं आहे. पाकिस्तानने केवळ कोरोनाचे नियंत्रणच थांबवले नाहीतर, या महामारी काळात आपल्या अर्थव्यस्थेकडं सुद्धा लक्ष दिले, असे WHO चे प्रमुख तेड्रोस अ‍ॅडहॅनम यांनी म्हटलं आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यात ट्रेड्रोस यांनी सांगितलं की, पाकिस्तानने पोलिओसाठी मागील काही वर्षात जी आखणी केलेली. त्याचा वापर करुन त्यांनी कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न केला. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना घरा-घरात जाऊन पोलिओचा डोस देण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. त्याच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पाकिस्तानने ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट साठी मदत घेतली. या रणनीतीमुळेच कोरोना संसर्गावर पाकिस्तानला नियंत्रण मिळवता आले, त्याचसोबत अर्थव्यवस्थेचा गाडा सुद्धा रुळावर आणला, असे टेड्रोस म्हणाले.

कोरोनावर प्रसार नियंत्रणात आल्याने पाकिस्तानात स्थिरता आली. त्यामुळे आता त्यांच्या अर्थव्यवस्थेनेही वेग घेतला आहे. कोरोना रोखणे आणि अर्थव्यवस्था सांभाळणे दोन्ही गोष्टी एकाच वेळीच व्हायला हव्यात. त्यापैकी कोणत्या एका गोष्टींची निवड करत येत नाही. तसेच पाकिस्तानबरोबर थायलंड, इटली, उरुग्वे आणि इतर देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे टेड्रोस यांनी कौतुक केलं. यापूर्वी मे महिन्यात जगाने कोरोनाचा सामना कसा करावा हे पाकिस्तानकडून शिकावे असे, म्हणत जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसा केली होती.

पाकिस्तानात ३६ टक्के वर्कफोर्समध्ये कोरोनाविरुद्ध इम्युनिटी विकसित

पाकिस्तानात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. पाकिस्तानातील ३६ टक्के वर्कफोर्समध्ये कोरोनाविरुद्ध इम्युनिटी विकसित झाली आहे. असे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ब्लड डिसीज, कराचीमधील या संस्थेने केलेल्या स्टडीला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमध्येही प्रकाशित करण्यात आले आहे.