PM Kisan : शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! ’पीएम किसान योजना’ अंतर्गत सरकारने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी संसदेत माहिती दिली की, पीएम किसान योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम वाढवण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही. यामुळे शेतकरी कुटुंबांना पहिल्या प्रमाणेच 6,000 रुपये प्रतिवर्ष आर्थिक सहाय्य दिले जाईल.

जाणून घ्या काय म्हणाले कृषीमंत्री…
तोमर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, पीएम किसान योजनेंतर्गत ठरलेल्या रक्कमेत वाढ करण्याचा सरकारचा विचार नाही. सध्या दरवर्षी 6,000 रुपये शेतकर्‍यांना दिले जातात. ही रक्कम लाभार्थ्यांच्या आधार सीड डेटाच्या आधारावर दिली जाते.

31 मार्चपर्यंत या राज्यांच्या शेतकर्‍यांना मिळेल सूट
सध्या आधार सीडची प्रक्रिया असाम, मेघालय, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये केली जात नाही. याबाबत या राज्यांना 31 मार्च, 2021 पर्यंत सूट देण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये जवळपास 70,82,035 शेतकरी कुटुंबांना विविध हप्ते कव्हर करण्यासाठी योजनेचा लाभ दिला आहे. तोमर म्हणाले, राज्यात या योजनेंतर्गत 7,632.695 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यात लाभार्थिंची संख्या 1,45,799 आहे, तर दौसा जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या 1,71,661 आहे.

अयोग्य असल्यास परत घेतले जातील पैसे
महाराष्ट्रात पीएम किसान योजनेंतर्गत अयोग्य शेतकर्‍यांकडून पैशांच्याच्या वसुलीबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना तोमर म्हणाले, केंद्र सरकारने या वर्षी 11 मार्चपर्यंत जवळपास 78.37 कोटी रुपयांची वसूली केली आहे.