आता ठरलंय एकतर मी जिवंत राहिल किंवा दहशतवादी : नरेंद्र मोदी

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने भारताला सोपवले नसते तर ती त्यांच्यासाठी ‘काळरात्र’ ठरली असती असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. गुजरातमधील पाटण येथील सभेला संबोधित करत होते. पंतप्रधान पदाच्या खूर्चीवर राहू किंवा नाही, परंतु आता ठरलंय एकतर मी जिवंत राहिल किंवा दहशतवादी, असे पंतप्रधान यांनी सांगितले.

बालाकोट येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वायुसेनेने हा हल्ला परतवून लावला. यावेळी विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या हाती लागले होते. यानंतर पाकिस्तानने भारताच्या दबावामुळे दोन दिवसात त्यांना परत सोपवले होते. मोदी म्हणाले, आम्ही पाकिस्तानला चेतावणी दिली होती की आमच्या पायलटला काही झाले तर जगभर मोदींनी तुमच्यासोबत काय केले हे सांगण्याची वेळ तुमच्यावर येईल. एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने मोदींना पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी १२ मिसाईल तयार ठेवल्याचे सांगितले होते. परंतु पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी अभिनंदन यांना भारताच्या हवाली केले. अन्यथा ती त्यांच्यासाठी काळरात्र ठरली असती.

ADV

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. देशभरात ११५ जागांवर मतदान होणार आहे. आमचे सरकार सत्तेवर येईल परंतु गुजरातमधून भाजपने २६ जागा जिंकल्या नाही तर याची चर्चा २३ मे रोजी टीव्हीवर होतील. म्हणून गुजरातमधील लोकांनी भूमीपुत्राला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.