अमेरिकन भारतीय मला मतदान करतील : डोनाल्ड ट्रम्प

पोलिसनामा ऑनलाईन – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून ते चांगले काम करत आहेत. अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून अमेरिकन भारतीय मला मतदान करतील असा आशावाद अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे .

अमेरिकन भारतीय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या नात्यावर ट्रम्प यांनी प्रकाश टाकला. मला विश्वास आहे की, 3 नोव्हेंबर रोजी होणार्‍या निवडणूकीत अमेरिक भारतीय नागरिक मला मतदान करतील. अमेरिकन भारतीय नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसमर्थन आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिक मला मतदान करतील असा विश्वास आहे. दरम्यान, ट्रम्प यांचा हा प्रचाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ ट्रम्प विक्ट्री फायन्स कमेटीचे राष्ट्रीय अध्यक्ष किम्बर्ली गुइलफॉय यांनी ट्वीट केला होता आणि त्यांचा मुलगा डोनाल्ड ट्राइ जूनियर यांनी रिट्विट केला होता. या व्हिडीओवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं डोनाल्ड ट्रम्प उत्तर देत होते. गेल्यावर्षी ह्यूस्टनमध्ये मोदी ट्रम्प यांच्या संयुक्त भाषण आणि यावर्षी अहमदाबाद येथे झालेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमातील एक छोटी क्लीप आहे.