PM Modi Magic | पीएम मोदी जगात नंबर 1, अप्रुव्हल रेटिंगमध्ये जगभरातील मोठ-मोठ्या नेत्यांना टाकलं मागे!

नवी दिल्ली : PM Modi Magic | अमेरिकेतील कन्सल्टिंग फर्म मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या एका सर्व्हेनुसार, ७६ टक्के ग्लोबल अप्रुव्हल रेटिंगसह पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्टच्या सर्व्हेचा डाटा ६ ते १२ सप्टेंबर २०२३ कालावधीमधील आहे. जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू अजूनही कायम असल्याचे या सर्व्हेवरून दिसत आहे, असा दावा करण्यात आला आहे. (PM Modi Magic)

या रेटिंगमध्ये १०० टक्के लोकांपैकी ५ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आपले मत व्यक्त केले नाही. तसेच १८ टक्के लोकांनी डिसअप्रुव्हल केले. तर ७६ टक्के लोकांनी मोदींना पहिली पसंती दर्शवली. (PM Modi Magic)

स्विस राष्ट्रपती एलेन बेर्सेट हे ६४ टक्के अप्रुव्हल रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मॅक्सिकोचे राष्ट्रपती एन्ड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर ६१ टक्के रेटिंगने तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

आश्चर्य म्हणजे या सर्व्हेमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन ७ व्या क्रमांकावर आहेत. तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक १५व्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावर ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डिसिल्व्हा आणि पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आहेत.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या ४२ टक्क्यांच्या अप्रुव्हल रेटिंगसह ६व्या क्रमांकावर आहेत.
हे अप्रूव्हल रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ लोकांच्या मतदानावर आधारित आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलक संतप्त, विखे-पाटील न आल्याने सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Pune Metro- Ganeshotsav 2023 | पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला आणा मेट्रोमधून, पुणे मेट्रोकडून नियमावली जाहीर

ACB Trap Case | PhonePe वर लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

ऑनलाइन टास्क देत तरुणाची 31 लाख 30 हजारांची फसवणूक, हडपसरमधील प्रकार

पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका, घरात प्रवेश बंदी

Nashik Crime News | पती, पत्नी आणि त्याची गर्लफ्रेण्ड…, सततच्या छळा वैतागून तिनं उचललं टोकाचं पाऊल; नाशिक शहरात खळबळ