Pune Crime News | ऑनलाइन टास्क देत तरुणाची 31 लाख 30 हजारांची फसवणूक, हडपसरमधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रोडक्टचे रिव्ह्यू व रेटिंगचे वेगवेगळे टास्क देवून जास्त कमिशन देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी वेगवेगळे टास्क देऊन 31 लाखांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली. हा प्रकार जून 2023 मध्ये घडला आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी हांडेवाडी, हडपसर येथील 37 वर्षाच्या व्यक्तीने वानवडी पोलीस ठाण्यात (Pune Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी Telegram ID@SHEMRUS1026, www.semrush21.com या बेवसाईट व बँक खातेधारक यांच्यावर आयपीसी 419, 420, 34, आयटी अॅक्ट (IT Act) 66 (सी), 66(डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना प्रोडक्टचे रिव्ह्यू व रेटिंगचे वेगवेगळे टास्क दिले. टास्क पूर्ण केल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे सांगून टेलिग्राम आयडी देऊन त्यांना जॉईन होण्यास सांगितले. सायबर (Cyber Crime) चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर 31 लाख 30 हजार 748 रुपये जमा करण्यास भाग पाडले. पैसे जमा केल्यानंतर कोणताच परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांकडून वानवडी पोलिसांना तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे (Senior PI Bhausaheb Pathare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | “पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये अशी अपेक्षा ही मानसिक क्रूरता”
मुंबई हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

Pune Crime News | क्रेडिट कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने पुण्यातील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; नाना पेठेतील घटना

पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालचा दणका, घरात प्रवेश बंदी