केदारनाथ जवळील गुहेत मोदींची ध्यानधारणा ; रात्रभर बसणार गुहेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यातील प्रचार संपल्यानंतर १२ ज्योतिलिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ येथे नरेंद्र मोदी दर्शनासाठी गेले आहेत. मोदी केदरानाथ जवळील एका गुहेमध्ये ध्यानाला बसले असून मोदी स्वत: २ किलोमीटर पायी चालत गुहेपर्यंत गेले. मोदी उद्या सकाळपर्यंत गुहेमध्ये ध्यानधारणा करतील. नरेंद्र मोदी हे १९ तारखेला म्हणजेच उद्या बद्रीनाथाच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत.

या आधी ३ मे २०१७ रोजी मोदींनी केदारनाथला आले होते. मोदींनी केदारनाथ यांचे दर्शन घेऊन रुद्राभिषेक केला होता. मोदी हवाई दलाच्या के १७ हेलीकॉप्टरमधून केदारनाथ इथे आले. उत्तराखंडच्या पारंपरिक वेशभूषेत मोदी दिसत आहेत.पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून चौथ्यांदा मोदी केदारनाथ मंदिरात आले. तिथे त्यांनी विधीवत पूजा केली आणि विजयासाठी साकडं घातलं.

रविवारी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन विधीवत पूजा केली.