PM मोदींनी समुद्राचे सूर्याशी संबंध, लाटांच्या दु:खावर केली कविता, ‘अशी’ मिळाली प्रेरणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच एक ट्विट करत म्हटलं की, “ये संवाद मेरा भाव विश्व है | इस संवाद भाव को शब्दबद्ध करके आपसे साझा कर रहा हू |” मामल्लपुरम समुद्र किनारी सुर्याची ताजी किरणं, समुद्राच्या लाटा, आणि शांत वातावरण पाहून मोदींनी आपली कविता लिहिली आहे.

मोदींनी शनिवारी समुद्र किनाऱ्यावर प्लॉगिंग (सकाळी फिरायला गेल्यावर प्लास्टिक आणि बाटल्यांचा कचरा उचलणं) करताना आपलं 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते कचरा उचलताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणांना स्वच्छ ठेवण्यासाठी ते अपील करत आहेत. मोदींनी आठ कडव्यांची कविता लिहित समु्द्र आणि सुर्याचा संबंध, लाटा आणि त्यांच्या त्रासाबद्दल सांगितलं आहे. त्यांचा एक यात्रा नावाचा कवितासंग्रह देखील प्रकाशित आहे.

शनिवारी मामल्लपूरमच्या समुद्रकिनाऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींच्या हातात एक छडीसारखी वस्तू होती. लोकांनी याबाबत जिज्ञासा होती. रविवारी त्यांनी सांगितले की, तो एक अ‍ॅक्युप्रेशर रोलर होता ज्याचा ते वापर करतात. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

Visit : Policenama.com