खूप झाले, आता सहन करणार नाही, नरेंद्र मोदींचा इशारा

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दहशतवाद प्रकरणी आता गप्प बसणार नाही. आता खूप झाले, सहन करणार नाही अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता इशारा दिला आहे. पुलवामा आणि उरी हल्ल्यावर सरकारने कडक कारवाई केली आहे, याची आठवण मोदींनी करुन दिली. ‘सीआरएसएफ’च्या ५० व्या स्थापना दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सीआयएसएफला देश आणि औंद्योगिक प्रतिष्ठानच्या सुरक्षेचा आधार असल्याचे सांगत त्यांनी सीआयएसएफचे कौतुक केले. वैभवशाली भारताच्या निर्माणात सीआयएसएफचे योगदान मोठे आहे. यात महिलांचेही महत्त्वाचे स्थान आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण खूप आहे.  त्यामुळे या मुलींसोबत मी त्यांच्या आईचेही अभिनंदन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ADV

गाझीयाबादमधील सीआयएसएफ कॅम्पमधील जवानांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, तुमच्या हातात देशाची सुरक्षा देण्यापेक्षाही तुमचे काम मोठे आहे. तुम्ही तुमचे काम किती नम्रपणे करता याची मी साक्षीदार आहे. तुमचे काम खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळी विदेशी देशात संकट आले त्यावेळी सीआयएसएफच्या जवानांनी जीव धोक्यात घालून मदत केली.

नेपाळ आणि हैतीमध्ये झालेल्या भूकंपात आपण केलेल्या मदतीची दखल आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली होती. एखादे शेजारी राष्ट्र लढण्यास सक्षम नसेल तर तो देशातील सुरक्षेला नुकसान पोहोचवण्याचे काम करतो. तो म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे, असे म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला टोला लगावला.

ह्याहि बातम्या वाचा –

#Loksabha election बॉलिवूडचा भाईजान भाजपच्या ‘या’ दिग्गज महिलेला देणार आव्हान ?

आमदार अनिल भोसले पुन्हा सक्रिय होणार ?

२२ वर्षीय युवतीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची अस्वस्थता वाढली

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली तर सर्वप्रथम शेतकरी कर्ज माफी : सुप्रिया सुळे