ग्रामीण भागाचा सरपंच असो की देशाचा पंतप्रधान कोणीही नियमांच्या वर नाही : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात आपण वेळेत लॉकडाऊन सुरु केल्यामुळे आमची स्थिती जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे. नियमांचे पालन केलेच पाहिजे. जे लोक नियमांचे पालन करत नाहीत त्यांनी टोकावे लागेल, रोखावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे एका देशाच्या पंतप्रधानालाही दंड भरावा लागला आहे. भारतात देखील स्थानिक प्रशासनाने अशीच सतर्कतेने काम केले पाहिजे. हे 130 कोटी लोकांचे रक्षण करण्याचे अभियान आहे. भारतात सरपंच असो की देशाचा पंतप्रधान असो, कोणीही नियमांच्या वर नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, खास करून कंटेनमेंट झोनची आपल्याला विषेश काळजी घ्यायची आहे. आपल्याला नियम न पाळणाऱ्या लोकांना रोखावं लागेल आणि त्यांना नियमांचं महत्त्व समजावून सांगावे लागेल. जगातल्या इतर देशाच्या तुलनेत भारतातील परिस्थिती नियंत्रमात आहे. मात्र, आता अनलॉक 2 सुरु करताना आपल्याला अधिक काळजी घ्याची आहे. निष्काळजी पणा करून नका असंही त्यांनी सांगितलं आहे. आज व्हिडोच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाशी संवाद साधत आहेत.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी व छट पुजेपर्य़ंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केला जाईल. 80 कोटी जनतेला मोफत अन्न देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत म्हमजेच पुढील पाच महिने देणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.