PM मोदींची नवी घोषणा ! रोजगार निर्मितीसाठी देणार 50 हजार कोटी, 6 राज्यांना फायदा मिळणार

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे अनेक मजूर गावी परतले असून मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केले आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील 116 जिल्ह्यांना होणार आहे. या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या बिहारमधील खगडिया गावातून होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. या योजनेचे नाव ‘गरीब कल्याण योजना’ असे असून शुक्रवारी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

‘गरीब कल्याण योजना’ या योजनेअंतर्गत कामगारांना 25 प्रकारची कामे दिली जाणार आहे. यामध्ये अंगणवाडी केंद्र, ग्रामीण रस्ते, ग्रामीण आवास, रेल्वेची कामे, सोलार पम्पसेट, फायबर ऑप्टिक केबल पसरवण्याचे काम अशा प्रकारची कामे असणार आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा सहा राज्यांतील 116 जिल्ह्यांमधील ही योजना सुरू होणार आहे. 116 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी किमान 25 हजार मजूर गावी परतल्याचे केंद्राला आढळळ्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या योजनाचा लाभ 29 लाख मजुरांना होणार असून पुढील 4 महिने (125 दिवस) रोजगाराची हमी देणारी योजना राबवली जाणार आहे. गरीब कल्याण रोजगार योजने अंतर्गत राजस्थानमधील 22, मध्यप्रदेशातील 24 उत्तरप्रदेशातील 31 बिहारमधील 32 तर ओडिशातील 4 आणि झारखंडमधील तीन जिल्ह्यात गरीब कल्याण रोजगार योजना राबविण्यात येणार आहे.