PM मोदींचा मोठा निर्णय ! आधी राज्यांशी बोलणार मग ‘कोरोना’ लशीची किंमत ठरवणार

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. पुढील आठवड्यात ब्रिटनमधील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. परंतु, भारतातील नागरिकांना प्रश्न पडला आहे की भारतातील नागरिकांना कोरोनाची लस कधी मिळणार आणि किंमत किती असणार ? याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजसर्वपक्षीय बैठक घेतली. कोरोना लशीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक असल्याचं समजतं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत लशीबद्दल मोठा खुलासा केला. कोरोना आणि लशीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात ते म्हणले, “कोरोनाच्या लशीचं काम वेगानं सुरू आहे. 8 लशींवर सध्या वेगानं काम सुरू असून लवकरच त्या उपलब्ध होणार आहेत. येत्या आठवड्यांमध्ये ही लस येणे अपेक्षित आहे. कोरोना लस प्रथम वृद्ध, कोरोना वॉरियर्सना दिली जाऊ शकते. आठ लशींवर सध्या काम सुरू आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये लसीबाबत चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे. शास्त्रज्ञांकडून मान्यता मिळाल्यानंतर लवकरच त्यावर काम सुरू होईल. भारत एका विशेष सॉफ्टवेअरवर काम करत आहे जे प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचते का यावर लक्ष ठेवेल.”

कोरोना आणि लशीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या बैठकीत लशीबद्दल मोठी माहिती दिली आहे. कोरोनाच्या लशीचं काम वेगानं सुरू आहे. 8 लशींवर सध्या वेगानं काम सुरू असून लवकरच त्या उपलब्ध होणार आहेत. येत्या आठवड्यांमध्ये ही लस येणे अपेक्षित आहे. कोरोना लस प्रथम वृद्ध, कोरोना वॉरियर्सना दिली जाऊ शकते, असे पंतप्रधान मोदींनी सूचित केलं आहे. सर्वपक्षीयांच्या बैठकीत पीएम मोदी म्हणाले की आठ लशींवर सध्या काम सुरू आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये लसीबाबत चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे. शास्त्रज्ञांकडून मान्यता मिळाल्यानंतर लवकरच त्यावर काम सुरू होईल. भारत एका विशेष सॉफ्टवेअरवर काम करत आहे जे प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचते का यावर लक्ष ठेवेल.

सध्या लशीचं वितरण कसं करता येईल तसंच त्याचं स्टोअरेज करण्यासाठी कसं नियोजन करता येईल यावर काम सुरू आहे. कोरोनाच्या लशीची किंमत किती असावी याबाबत सर्व राज्यांसोबत चर्चा करू. लशीची किंमत किती असेल याबाबत केंद्र आणि सर्व राज्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.