अबब ! 20 हजार पटीनं विकलं गेलं PM मोदींचं फोटो स्टॅन्ड, 1 कोटी रूपयांची लागली बोली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नमामि गंगे योजनेसाठी निधी गोळा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शक्कल लढवली आहे. यासाठी मोदींनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तू लिलावात काढल्या असून याद्वारे मोदी या योजनेसाठी निधी गोळा करणार आहेत. मात्र यामध्ये एक हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे. या वस्तूंमधील नरेंद्र मोदी यांच्या फोटो स्टँड जळपास 1 कोटी रुपयांना विकले गेले आहे. दोनच दिवसात नागरिकांनी या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावून या वस्तू खरेदी केल्या आहेत.

20 हजार गुना में ब‍िका PM मोदी का फोटो स्टैंड, 1 करोड़ रुपये लगी बोली

या फोटो स्टँडची बेसिक किंमत हि 500 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र त्याच्यावर सुमारे 1 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. त्याचबरोबर एका चांदीच्या कळशीला आणि त्यावर असणाऱ्या नारळाला देखील १ कोटी रुपयांची बोली लागली आहे. पंतप्रधान मोदी यांना हे स्टॅन्ड गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी भेट दिले होते.

20 हजार गुना में ब‍िका PM मोदी का फोटो स्टैंड, 1 करोड़ रुपये लगी बोली

मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्या उपरण्याची बोली जवळपास 11 कोटी लागल्याचे सांगण्यात येत आहे. या उपरण्याची देखील बेसिक किंमत 500 रुपये ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर सध्या या वस्तूंवर लागलेल्या बोलींचा तपास करण्यात येत असून यामध्ये एखाद्या वस्तूवरील बोली खोटी निघाल्यास त्या वस्तूवर पुन्हा बोली लावली जाणार आहे. मागील वेळी हि बोली ऑफलाईन ठेवण्यात आली होती. मात्र यावेळी हि बोली ऑनलाईन ठेवण्यात आली आहे.

20 हजार गुना में ब‍िका PM मोदी का फोटो स्टैंड, 1 करोड़ रुपये लगी बोली

दरम्यान, यावेळी या लिलाव प्रक्रियेत 2772 वस्तू ठेवण्यात आल्या असून 14 सप्टेंबर रोजी सुरु झालेली हि लिलाव प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2019 पर्यंत सुरु राहणार आहे.