PM Narendra Modi | ‘शरद पवारांच्या मुलीचं कल्याण करायचं तर….’, राष्ट्रवादीचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपला (BJP) रोखण्यासाठी देशातील 15 विरोधी पक्षांची नुकतीच पाटणा येथे बैठक झाली. या बैठकतीत विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजुटीचा नारा दिला आहे. विरोधकांची बैठक झाली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) परदेश दौऱ्यावर होते. मात्र, मंगळवारी मध्य प्रदेशच्या भोपाळ येथे जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांच्या एकीवरुन मोदींनी (PM Narendra Modi) लक्ष्य केले. पाटण्यातील बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली, अशी टीका मोदींनी केली. तसेच त्यांनी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावे घेत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, पाटणाच्या बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. घोटाळ्याविरोधी कारवाईतून विरोधी पक्ष पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्ट नेते एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला हमी देतो की, मी त्यांच्यापैकी एकालाही सोडणार नाही आणि प्रत्येक घोटाळेबाजांवर कारवाई करेन.

हल्ली वारंवार गॅरंटी हा शब्द वापरला जातो, हे सगळे विरोधी पक्षनेते, हे लोक भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे. लाखो-करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची ही गॅरंटी आहे. काही दिवसांपूर्वी यांनी एकत्र फोटो काढले. या फोटोमध्ये असलेल्या सगळ्यांची टोटल केली तर 20 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याची गॅरंटी आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. तसेच हे सर्वजण त्यांच्या मुला-बाळांचं भलं करण्यासाठी एकत्र आले आहेत, असेही मोदी म्हणाले.

जर तुम्हाला गांधी परिवाराच्या मुला-मुलींचं कल्याण करायचंय तर काँग्रेसला (Congress) मत द्या. शरद पवारांच्या (Sharad Pawar) मुलीचं कल्याण करायचंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मत द्या. लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या मुलांचं भलं करायचं, तर राजदला (RJD) मत द्या. मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या मुलाचं चांगलं करायचं असेल तर सपा ला मत द्या, अब्दुल्ला यांच्या परिवारातील मुलांचं कल्याण करायचंय, तर नॅशनल कॉन्फरन्सला (National Conference) मत द्या. पण तुम्हाला तुमच्या कुटुंबातील मुला-मुलींचं भलं करायचंय, त्यांचं कल्याण करायचंय तर तुम्ही भाजपला मत द्या, असं आवाहन करत मोदींनी सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आणि त्यांच्या मुलांवर टीका केली.

राष्ट्रवादीचा 70 हजार कोटींचा घोटाळा

पाटण्यात जे विरोधक एकत्र आले होते, त्यांची यादी केली तर सर्व पक्षांनी मिळून 20 लाख कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे मोदींनी सांगितली. तसेच एकट्या काँग्रेस पक्षाने जवळपास लाखो कोटींचा घोटाळा केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. विरोधकांच्या घोटाळ्याचं मीटर कधी डाऊनच होत नाही, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी घणाघात केला.

Web Title :  PM Narendra Modi | ‘If the welfare of Sharad Pawar’s daughter is to be…’, Prime Minister Narendra Modi attacked the opposition by taking the name of NCP (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा