सौगंध इस मिट्टी की, मैं देश नही मिटने दूँगा ! राजस्थानमध्ये मोदींचा पुन्हा एल्गार 

जयपूर : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकांमध्ये दिलेल्या नाऱ्याचा आज पुन्हा राजस्थानातील चुरू येथील जाहीर सभेत पुनरुच्चार केला. सभेच्या सुरुवातीलाच जनसमुदायाने मोदी मोदी च्या घोषणा दिल्या. तर भारत माता की जय या घोषणेने संपूर्ण सभा दणाणून सोडली.
भारताने केलेल्या पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर हवाई दलाचे सर्व देशभरातून कौतुक आणि अभिनंदन होताना दिसत आहे. अशातच आता मोदींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देश सुरक्षित हातांमध्ये असल्याचे वक्तव्य मोदींनी केलं आहे. शिवाय मी हा देश मिटू देणार नाही अशी ग्वाही यावेळी माेदींनी दिली. माझ्यापेक्षा देश मोठा आहे असे ते म्हणाले.
‘माझ्यापेक्षा पक्ष मोठा आहे आणि पक्षापेक्षाही देश मोठा आहे’ असं म्हणत मै देश का प्रधानसेवक बोल रहा हूँ असे ते म्हणाले. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले परंतु राजस्थान सरकार त्याला सहकार्य करत नाही अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान यावेळी बोलताना मोदींनी क्‍या है वन रैंक, वन पेंशन आणि राजस्थान येथील शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांवर भाष्य केलं.

“सौगंध इस मिट्टी की,
मैं देश नही मिटने दूँगा !
मेर वचन है भारत माँ को,
तेरा शीष नही झुकने दूँगा
जाग रहा है देश मेरा,
हर भारतवासी जितेगा
न भटकेंगे न अटकेंगे,
कुछ भी हो हम देश नही मिटने देंगे

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच 

निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला 

पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु

पाकच्या विमानांनी केला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न 

‘या’ 10 हून अधिक जागांवर भारतीय हवाई दलाने केला हल्ला 

भारत कमजोर देश नाही : मुख्यमंत्री