फायद्याची गोष्ट ! एकदम ‘फ्री’मध्ये LPG घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ‘हा’ नंबर रजिस्टर करणं खुप गरजेचं, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधानांनी अनेकांनी गरीब लोकांसाठी महत्वाची पावले उचलत दिलासा दिला. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर देण्याचाही समावेश आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींच्या यादीमध्ये आपणासही समाविष्ट केले गेले तर आपणास देखील विनामूल्य एलपीजी गॅस सिलिंडर मिळू शकेल. या योजनेंतर्गत लाभ देण्याची सर्व तयारी केल्यानंतर सरकारने सिलिंडरचा पुरवठादेखील सुरू केला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. या पैशातून रोख पैसे देऊन आपण सिलिंडर घेऊ शकता.या योजनेंतर्गत नोंदणीकृत लोकांनाच या सरकारी योजनेचा लाभ मिळेल.

सरकारच्या या योजनेचा फायदा फक्त त्या लोकांनाच होत आहे ज्यांनी या योजनेंतर्गत स्वत: ची नोंदणी केली आहे. खात्यातील पैसे सिलिंडर घेऊन आलेल्या व्यक्तीस देऊन उपयोगात आणले जातील.

(१)  लाभार्थीचा मोबाइल नंबर नोंदविला जाणे आवश्यक – एलपीजी सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी मोबाइल नंबर नोंदवणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. या पैशातून तुम्ही रोख पैसे देऊन सिलिंडर घेऊ शकता.

(२)  नवीन गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी किमान 15 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. उज्ज्वला योजनेंतर्गत 14.2 किलोचे 3 सिलिंडर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत देण्यात येणार आहेत. 1 महिन्यात फक्त एक सिलिंडर विनामूल्य दिले जाईल.