‘जेट’मधील नोकरी पहिले गेली, त्यानंतर PMC बँकेतील 90 लाख, आता हार्ट अटॅकमुळं ‘जीव’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यानंतर गुंतवणूकदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक जण यामुळे त्रस्त झाले असून आज एका खातेदाराचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. संजय गुलाटी असे या 51 वर्षीय खातेदाराचे नाव असून त्यांचे या बँकेत जवळपास 90 लाख रुपये होते.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय काल गुंतवणूकदारांच्या एका रॅलीत सहभागी झाले होते. त्यानंतर ते घरी आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

व्यापारासाठी पैश्यांची होती गरज –
संजय गुलाटी यांच्याबरोबरच त्यांचे 80 वर्षीय वडील सीएल गुलाटी, 75 वर्षीय आई वर्षा गुलाटी आणि 46 वर्षीय पत्नी बिंदु गुलाटी यांचे देखील या बँकेत खाते आहे. संजय यांना त्यांच्या व्यापारासाठी पैश्यांची गरज होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते चिंतेत होते. त्यांना व्यापारात मोठे नुकसान सहन करावे लागत होते. सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसाठी पीएमसी बँक जबाबदार असल्याचे म्हणले जात आहे.

एक दिवस आधीच वाढवली होती मर्यादा –
रिझर्व्ह बँकेने खातेदारांना दिलासा देताना पैसे काढण्याची मर्यादा 25,000 वरून 40,000 रुपये केली होती. आतापर्यंत तीन वेळा आरबीआयने या बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.

तिसऱ्या वेळी वाढवली मर्यादा –
3 ऑक्टोबर रोजी पैसे काढण्याची मर्यादा 10,000 वरून 25,000 रुपये केली होती. त्यानंतर आता हि रक्कम 40,000 रुपये केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांच्या पैश्याची सुरक्षितता बँकेची पहिली प्राथमिकता आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी