PMC बँक घोटाळा : तिन्ही आरोपींना 23 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी, 18 ऑक्टो.ला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएमसी बँक घोटाळ्यामुळे बँकेने खातेधारकांना खात्यामधून ठराविक रक्कम काढण्यासाठीच परवानगी दिली आहे. यामुळे खातेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आता ग्राहकांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने तत्काळ सुनावणी करण्याला परवानगी दिली आहे. 18 ऑक्टोबरला याबातची सुनावणी होणार आहे.

दिल्लीत राहणाऱ्या बीके मिश्राने याबाबतची याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये ही मागणी करण्यात आली आहे की, सर्वसामान्य लोकांचे मेहनतीचे पैसे बँकेत अडकल्यामुळे दैनंदिन जीवनातील खर्च देखील भागवणे अवघड झाले आहे. त्यामुळे बँकेत जमा असलेल्या पैशांच्या सुरक्षेसाठी काही नियम केले जावेत. पंधरा लाख खातेधारकांबाबत चिंता व्यक्त करताना याबाबतच्या इन्शुरन्सची देखील मागणी यावेळी केली आहे.

50 ग्राहकांनी न्यायालयाबाहेर केले प्रदर्शन-
न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान अनेक लोकांनी न्यायालयाच्या बाहेर पैसे परत मिळावेत यासाठी आंदोलन केले. सध्या खातेधारक सहा महिन्याला 40 हजार एवढी रक्कम आपल्या खात्यातून काढू शकणार आहेत. त्यामुळे हे निर्बंध सुद्धा हटवण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

आरबीआयकडून निर्बध हटवण्याची मागणी-
याचिकेत म्हंटले आहे की, सहकारी बँकेत सर्वसामान्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सहकारी बँकांच्या कार्यशैली आणि त्यांच्या पद्धतीची माहिती ठेवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात यावी. तसेच पीएमसी बँकेत जमा असलेल्या पैशांवरील निर्बंध लादलेले आहेत ते सुद्धा हटवण्याची मागणी आरबीआयकडे करण्यात आली आहे.

पीएमसीचे माजी अधिकारी अरोडा यांना अटक –
मुंबई पोलिसांनी पीएमसीच्या सुरजीत सिंह अरोड़ा नामक माजी अधिकाऱ्याला बुधवारी अटक केली. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. याआधी देखील अरोडा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ते पीएमसी बँकेत निदेशक आणि लोन कमिटीचे सदस्य सुद्धा होते. 4355 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआईएल ग्रुपचे राकेश आणि सारंग वाधवान, पीएमसीचे माजी चेअरमन वरयाम सिंह आणि बँकेचे माजी अधिकारी जॉय थॉमस यांना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे.

तीन आरोपीना 23 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी –
बँक घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवन आणि त्यांचे पुत्र सारंग यांच्याव्यतिरिक्त बँकेचे माजी चेअरमन वरयाम सिंह यांना 23 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी अनेक खातेधारक न्यायालयाच्या बाहेर आंदोलन करत होते.

याच संदर्भात सोमवारी ईओडब्ल्यू ने पीएमसी बँकेचे जॉय थॉमस यांना अटक केली होती. 17 ऑक्टोबरला थॉमस यांची कोठडी संपणार आहे त्यामुळे थॉमस यांना सुद्धा न्यायालयात हजार केले जाऊ शकते.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी