PMKMY | शेतकर्‍यांना दरमहिना 3 हजार रुपये पेन्शन, PM किसानचे खातेधारक असा घेऊ शकतात लाभ; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – PMKMY | केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवत आहे. याअंतर्गत दरवर्षी आर्थिक मदत करण्यासोबतच शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजनाही राबवली जात आहे. पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Sammna Nidhi) अंतर्गत, सरकार दरवर्षी लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना थेट 6,000 रुपये हस्तांतरित करते, तर त्यांना पीएम किसान मानधन योजनेद्वारे 60 वर्षांनंतर पेन्शन दिली जाते. (PMKMY)

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणखी एक मोठा फायदा शेतकरी घेऊ शकतात. या योजनेत, नोंदणीकृत शेतकर्‍यांची कोणत्याही कागदपत्रांशिवाय थेट पंतप्रधान किसान मानधन योजनेत (Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana) नोंदणी केली जाईल आणि वयाच्या 60 नंतर त्यांना दरमहा पेन्शन मिळू लागेल. (PMKMY)

पीएम किसान मानधन योजना

पंतप्रधान किसान मानधन योजना ही लहान शेतकर्‍यांना पेन्शन देण्याची योजना आहे. या योजनेत 60 वर्षांनंतर दरमहा 3 हजार रुपये म्हणजेच 36 हजार रुपये वार्षिक पेन्शन दिली जाते. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी नोंदणी करू शकतो. त्यांनाही या योजनेत मासिक योगदान द्यावे लागेल. वयानुसार मासिक योगदान रु. 55 ते रु. 200 पर्यंत असू शकते.

किसान सन्मानचे खातेधारक असा घेऊ शकतात लाभ

पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना या पेन्शन योजनेत नोंदणीसाठी पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. पीएम किसान सन्मान नोंदणीच्या वेळी त्यांच्याकडून सर्व आवश्यक कागदपत्रे घेतली जातात.

या पेन्शन योजनेसाठीचे योगदान किसान सन्मान निधी अंतर्गत मिळालेल्या रकमेतूनही कापले जाईल. याचा अर्थ शेतकरी सन्मान खाते असेल तर वेगळे योगदान देण्याची गरज नाही.

Web Title  : PMKMY | pm kisan big benefit you will be registered in pm kisan mandhan without any documentation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त