PMSYM | ‘या’ सरकारी योजनेत दररोज 2 रुपये जमा करून मिळवा रू. 36000, जाणून घ्या कसा करावा अर्ज?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMSYM | सन 2019 मध्ये, केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना PM Shram Yogi Maandhan Yojana (PMSYM) सुरू केली. PMSYM ही असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एक सरकारी योजना आहे. या योजनेच्या मदतीने देशातील मजुरांना सरकारकडून दरमहा 3000 रुपये पेन्शन (Rs.3000 monthly pension) दिली जाते. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेवूयात –
दरमहा मिळतील 3000 रुपये
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील 42 कोटी मजुरांना लाभ मिळणार आहे. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील मजूर अर्ज करू शकतात, त्यांना 60 वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये हप्ता भरावा लागेल.
वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतरच कामगारांना पेन्शनची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. या योजनेंतर्गत, वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर, मजुरांना दरमहा 3,000 रुपये म्हणजे वार्षिक 36,000 रुपये मिळतील. (PMSYM)
प्रधानमंत्री मानधन योजनेची पात्रता-
– वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
– करदाते या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.
– EPFO, NPS, ESIC अंतर्गत समावेश नसावा.
– अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असावे.
– अर्जदाराचे स्वतःचे बचत बँक खाते किंवा जन धन बँक खाते असणे आवश्यक.
– यात रस्त्यावरील विक्रेते, हेड लोडर, वीटभट्ट्या, मोची, चिंधी वेचणारे, घरकामगार, धोबी, रिक्षाचालक, ग्रामीण भूमिहीन मजूर, शेतमजूर, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार इत्यादींचा समावेश होतो.
अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या?
– प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत maandhan.in/shramyogi येथे लॉग इन करा.
– होम पेजवर, आता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा’ या लिंकवर क्लिक करा, त्यानंतर Self Enrollment वर क्लिक करा.
– तुमचा मोबाईल नंबर नोंदवा आणि Proceed वर क्लिक करा.
– आता अर्जदाराचे नाव, ईमेल आयडी, कॅप्चा कोड भरल्यानंतर ओटीपी मिळेल, तो भरा.
– आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
– फॉर्म सबमिट केल्यानंतर तो प्रिंट केल्याची खात्री करा.
Web Title :- PMSYM | pmsym you can invest money daily 2 rupees and get 36000 rupees yearly check how PM Shram Yogi Maandhan Yojana work
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mutual Fund Investment | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या Alpha आणि Beta काय असतं?
Lata Mangeshkar | लतादीदींच गाणं नसल्याने ‘मेरा नाव जोकर’ फ्लॉप?