‘दीर्घ’ प्रतिक्षेनंतर भारतात आज ‘लॉन्च’ होतोय Poco X2, असं पाहा Live

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोको एक्स2 हा पोकोचा दुसरा नवा स्मार्टफोन आहे. आज तो मोठ्या प्रतिक्षेनंतर लाँच करण्यात येत आहे. पोको आता एक स्वतंत्र कंपनी आहे, अशात या कंपनीकडून हा पहिला डिव्हाईस असणार आहे. मागील महिन्यात शाओमीने पोकोला एक वेगळी कंपनी बनविण्याची घोषणा केली होती. पोको एक्स2 बाबत बोलायचे तर कंपनीने म्हटले आहे की यात 120Hz डिस्प्लेसोबत फास्ट चार्चिंग टेक्नॉलॉजी दिली जाणार आहे. हा डिसेंबरमध्ये लाँच झालेल्या रेडमी के30 चेच हे रिब्रँडेड वर्जन असू शकते.

पोको एक्स2 ची लाँचिंग आज नवी दिल्लीत होणार आहे. या इव्हेन्टचे लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूबवर होणार आहे. येथून तुम्ही हा इव्हेंन्ट लाईव्ह पाहू शकता. पोको एक्स2 च्या किंमतीची घोषणा अद्याप भारतात करण्यात आलेली नाही. परंतु, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, याची सुरूवातीची किंमत 18,999 रुपये असेल. असेही म्हटले जाते की चीनमध्ये लाँच झालेल्या रेडमी के 30 4जीचे रिब्रँडेड व्हर्जन असू शकते. जर असे असेल तर या डिव्हाईसची किंमत रेडमी के30 च्या आसपास असू शकते. चीनमध्ये याची सुरूवातीची किंमत सीएनवाय 1,599 (सुमारे 16,300 रुपये) ठेवण्यात आली होती.

पोको ब्रँडिंगसोबत पहिला स्मार्टफोन भारतात 2018 मध्ये सादर करण्यात आला होता. तेव्हा पोको एफ1 ला शाओमीने लाँच केले होते. या डिव्हाईसची सुरूवातीची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली होती. जेव्हा हा स्मार्टफोन लाँच केला गेला, तेव्हा हा स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन होता. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन आजसुद्धा विक्रिसाठी उपलब्ध आहे. मागील काही दिवसात त्याच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली. आता तो 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

पोको एक्स2 मध्ये मिळणार्‍या काही कम्फर्ड स्पेसिफिकेशन्स बाबत बोलायचे तर यामध्ये 120Hz डिस्प्लेसह 27W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. कंपनीचा दावा आहे की, या चार्जिंगद्वारे अवघ्या 25 मिनिटात 40 टक्के पर्यंत बॅटरी चार्ज करता येईल. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 730 जी दिले जाऊ शकते.