POCSO Court | पोक्सो न्यायालय : विरूद्ध लिंगाचा मित्र असण्याचा अर्थ हा नाही की तो लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोक्सो न्यायालयाने (POCSO Court) म्हटले की, विरूद्ध लिंगाचा (Opposite Gender) मित्र असण्याचा अर्थ हा नाही की तो लैंगिक इच्छा (sexual desire) पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे. न्यायालयाने 20 वर्षाच्या आरोपीला आपली 13 वर्षाची मैत्रिण आणि दूरची नातेवाईक असलेल्या मुलीसोबत दुष्कृत्य केल्याच्या आरोपात 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. (POCSO Court)

 

यामध्ये म्हटले की, असा गुन्हा करून दोषीने मुलीचे जीवन उद्ध्वस्त केले आणि इतक्या कमी वयात स्वताचे जीवन बरबाद केले.

 

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, विशेष न्यायाधीश प्रीती कुमार घुले (Special Judge Preeti Kumar Ghule) यांनी म्हटले की, आरोपीची शिक्षा आजच्या तरुणांना एक संदेश देईल, जे आरोपीच्या वयोगटातील आहेत. अनियंत्रित वासना (Uncontrolled lust) त्यांचे भविष्य, करियर आणि प्रगतीचा सुवर्ण काळ खराब करू शकते.

पीडितेचे भविष्य अंधकारात
न्यायालयाने म्हटले की, भविष्याच्या प्रगतीचा पाया तरूणांच्या सुरुवातीच्या दिवसात तयार होतो, मग ते कोणत्याही लिंगाचे असोत. न्यायाधीशांनी म्हटले, या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्ह्यामुळे आरोपीसोबतच पीडितेचे भविष्यसुद्धा अंधकाराच्या सावटाखाली आले. आरोपीला आपल्या कृत्याचे परिणाम समजले आहेत, त्यास जास्तीत जास्त शिक्षा देणे आवश्यक नव्हते.

 

न्यायालयाने (POCSO Court) म्हटले की, अल्पवयीन पीडितेला जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकारणाच्या सेवेंतर्गत भरपाईचा अधिकार आहे.
दोषीच्या कृत्यामुळे अल्पवयीन मुलीच्या लग्नात अडचणी येतील कारण तिचा साखरपुडा अगोदरच मोडला आहे.

 

 

Web Title :- POCSO Court | friend of opposite gender doesn t mean she is available for satisfying sexual desire says pocso court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | पुणे महापालिकेला ‘घबाड’ सापडलं ! मनपाला मिळणार 10 हजार 60 कोटी रुपयांचा महसुल; तब्बल 7,440 Km च्या बेकायदा केबल्स आढळल्या, रिलायन्सच्या ‘जिओ डिजिटल फायबर प्रा.लि.’ चे प्रमाण सर्वाधीक

Vidhwa Pension Scheme | मोदी सरकार ‘या’ महिलांच्या अकाऊंटमध्ये दरमहा जमा करेल 2250 रुपये, आपल्या राज्याच्या हिशेबाने तपासा तुमच्या खात्यात किती रक्कम येईल?; जाणून घ्या

Pune Crime | 50 लाखाचे खंडणी प्रकरण ! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुधीर रामचंद्र आल्हाटला अटक; माहिती अधिकार कार्यकर्त्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्याविरुद्ध FIR

Earn Money | नोकरी सोडून तुम्ही सुरू करू शकता ‘हा’ सुपरहिट बिझनेस, दरमहा आरामात होईल 5-10 लाखांची कमाई; जाणून घ्या कशी