Pok वरून मोठा इशारा, IMD नं हवामान अंदाजाच्या यादीत जोडलं ‘गिलगिट-बाल्टिस्तान’चं नाव

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – गिलगित-बाल्टिस्तानबाबत भारत-पाकिस्तानमध्ये वाद सुरु आहे. दरम्यान, भारत हवामान खात्याने जम्मू-काश्मीरचा हवामानाचा अंदाज जाहीर केला, परंतु त्यात थोडा बदल झाला आहे. हवामान खात्याने जम्मू-काश्मीरच्या हवामानशास्त्रीय उपविभागाचा उल्लेख ‘जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगित-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद’ असा केला आहे.

मुजफ्फराबाद हा पाकिस्तान अधिकृत काश्मीरचा भाग आहे, तर गिलगित-बाल्टिस्तानचा भूभाग पाकिस्तानच्या अवैध कब्जाखाली आहे. नवी दिल्लीतील हवामान खात्याने जाहीर केलेल्या उत्तर पश्चिम भारतातील दैनिक फोरकास्टमध्ये मंगळवारपासून नावांमध्ये बदल दिसू लागले आहेत.

दररोज जाहीर केलेला रीजन-वाइज फोरकास्ट संपूर्ण उपविभागासाठी आहे, कोणत्याही विशिष्ट क्षेत्रासाठी नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नावे बदलण्यात आल्याची पुष्टी केली.

भारतीय हवामान खात्याचे हे पाऊल फक्त एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशच्या रुपाने लडाखची बदललेली परिस्थिती दर्शवित नाही तर एक महत्त्वाचा संदेशही देत आहे.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णया नंतर भारताची ही वृत्ती पहायला मिळाली आहे, ज्यामध्ये कोर्टाने संघीय सरकारला गिलगित-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याची परवानगी दिली होती. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामध्ये गिलगित-बाल्टिस्तान ऑर्डर 2018 च्या सरकारमध्ये सुधारणा करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे या भागात सार्वत्रिक निवडणुका घेण्यास अनुमती मिळाली आहे.

पीएके सुप्रीम कोर्टाच्या या आदेशावरून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, जम्मू-काश्मीर, लडाख आणि गिलगित-बाल्टिस्तानचा संपूर्ण परिसर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सांगितले गेले आहे. बेकायदेशीर पणे कब्जा केलेला हा एरिया पाकिस्ताननं रिकामा करायला हवा.