अन्नदान हे श्रेष्ठदान ! शिल्लक अन्न टाकून न देता App व्दारे करा ‘दान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता तुम्ही उरलेल्या अन्नाचे दान करू शकणार आहात. यासाठी फूड सेफ्टी एंड स्टॅण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन ऍप बनवत असून यामार्फत तुम्ही हे अन्नदान करू शकता. लवकरच हे ऍप तयार केले जाणार असून त्यावर सध्या काम चालू आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी जुलैपासून या नवीन नियमाची अंमलबजावणी केली जाणार या असून यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. यानंतर या ऍपवर कंपन्यांची नोंद केली जाणार असून नियम मोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे.

लवकर खराब होणाऱ्या पदार्थांना नष्ट केले जाते
एफएसएसएआयने दिलेल्या माहितीनुसार, भारत जगातील अन्न उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तरीदेखील भारत जगातील सर्वात जास्त भुख्या व्यक्ती असणाऱ्या 119 राष्ट्रांमध्ये भारत 103 क्रमांकावर आहे. मात्र काही कारणांमुळे लवकर खराब होणारे पदार्थ नष्ट केले जाते. मात्र लवकरच यावर तोडगा काढला जाणार असून याचा वापर या भुक्या लोकांना देण्यासाठी करण्यात येणार आहेत.

फूड रिकवरी सिस्टम झाली सुरु
यासाठी एफएसएसएआयने ‘भोजन बचाओ, भोजन बांटो खुशियां बांटो’ नावाने एक अभियान सुरु केले असून यामार्फत खाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कंपन्यांची नोंद देखील केली जाणार असून हे अन्न एकत्रित करणाऱ्या एजन्सीच्या कामगारांना यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –